नरेंद्र मोदी शैव हिंदुत्वाकडून वैष्णव हिंदुत्वाकडे आणि वैष्णव हिंदुत्वाकडून ब्राह्मणी हिंदुत्वाकडे श्रीधर तिळवे नाईक
भारतामध्ये शैव हिंदुत्व ही संकल्पना अजूनही फारशी रुजली नव्हती मिळणारा प्रतिसाद जवळजवळ शून्य होता पण बहुजन समाज जर का हिंदुत्ववादाशी जोडायचा असेल तर शैव हिंदुत्वशिवाय पर्याय नाही अशी माझी मांडणी होती आणि आहे
काँग्रेसने कधीही इस्लामचा धोका काय आहे याची परवा केली नाही आणि स्वतःला असुरक्षित समजणारा हिंदवी समाज हा हिंदुत्वाकडे वळत चालला. नेमके काय घडते आहे हे न कळल्याने काँग्रेस आपला तथाकथीत सेक्युलर अजेंडा रेटत राहिली
या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाकडे जायचेच असेल तर मग ते आपण आपल्या टर्म्स आणि कंडिशन वर गेले पाहिजे अशी धारणा असणारा एक नवा तरुणांचा वर्ग निर्माण होण्याची शक्यता मला दिसायला लागली होती आणि त्यातूनच पुढे शैव हिंदुत्व किंवा आगामीक सेक्युलरिझम असे दोन पर्याय आहेत हे लक्षात घेऊन मी माझी मांडणी करत आलो मी कायमच दोन्ही पर्याय पुढे ठेवले दुर्दैवाची गोष्ट अशी की यातल्या एकाही पर्यायाला 1999 पर्यंत फारसा प्रतिसाद नव्हता पण हळूहळू नरेंद्र मोदी यांच्यामुळे वातावरण बदलत गेले ही वस्तुस्थिती आहे नरेंद्र मोदी हे पाशुपत दर्शनाच्या राजर्षी महाराजांचे शिष्य होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच शैव आचार्यांनी त्यांना एकमताने पाठिंबा दिला साहजिकच 2014 ला नरेंद्र मोदी शैव हिंदुत्ववाद घेऊन उतरलेले होते आणि त्यांची मुख्य घोषणा हर हर महादेव होती साहजिकच ओबीसी समाजाने त्यांना प्रचंड प्रमाणात मते दिली
2019 मध्ये सुद्धा हे कायमच होते मात्र 2020 ला राम मंदिराच्या निमित्ताने नरेंद्र मोदींनी जय श्रीराम म्हणत वैष्णव हिंदुत्ववाद स्वीकारायला सुरुवात केली आणि इथूनच नरेंद्र मोदींच्या पतनाची सुरुवात झाली त्यांचा दाखवला गेलेला चेहरा आणि प्रत्यक्षात असलेला चेहरा यांच्यामध्ये प्रचंड फरक आहे की काय अशी शंका बहुजन समाजाला येऊ लागली वैष्णव हिंदुत्ववाद हा अंतिमतः ब्राह्मण हिंदुत्ववादाकडे जाणार हे खरे तर स्पष्टच होते आणि याबद्दलच्या अनेक वॉरनिंग्स मी माझ्या तत्कालीन लिखाणातून दिलेल्या आहेत मी निर्माण केलेला शैव -वैष्णव संघर्ष हा काल्पनिक आहे अशी गैरसमज करून घेणारे खूप लोक आहेत प्रत्यक्षात हा संघर्ष या देशांमध्ये वैष्णव धर्म निर्माण झाला तेव्हापासूनच आहे मुळात वैष्णव धर्म स्थापन करण्याचा उद्देशच बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांचा पाडाव हा होता तसा तो झाला आहे त्यानंतर मग शैवधर्माचा पाडाव करण्यासाठी हिंदू धर्म नावाची संकल्पना अत्यंत पद्धतशीरपणे राबवण्यात येऊ लागली आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये तिला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळायला सुरुवात झाली यामध्ये मुस्लिम सुद्धा सामील होते कारण त्यांना सुद्धा शैवधर्मी लोकांचा पराभव करणे आवश्यक वाटत होते वैष्णव धर्माने नेहमीच मुस्लिम राजवटींना पाठिंबा दिलेला आहे शैव असताना मुस्लिमांना विरोध करणारे राजपूत या काळामध्ये वैष्णव बनले आणि वैष्णव बनलेले राजपूत हे मुस्लिम राज्यांचा पाठीचा कणा बनले ही वस्तुस्थिती होय .याच काळामध्ये शैव पंडितांनी आपल्या शैव धर्माकडे पाठ फिरवलेली दिसते त्यातूनच पुढे महाराष्ट्रामध्ये देशस्थ आणि कराडे वगैरे शैव पंडित हे वैदिक ब्राह्मण किंवा ब्राह्मणी किंवा वैष्णव धर्माचे ब्राह्मण बनलेले दिसतात घरात शैव आणि बाहेर मात्र वैष्णव अशा प्रकारचे अत्यंत दुभंगलेले धोरण या लोकांनी अवलंबलेले दिसते नरेंद्र मोदी अशाच पद्धतीने वाटचाल करताना दिसतात ही वाटचाल कायमच शैव धर्माच्या वाटचालीसाठी घातक ठरलेली आहे ती नेहमीच अंतिमतः ब्राह्मण धर्मात लँड होते नरेंद्र मोदी यांचे काही वेगळे झालेले नाही आणि परिणामी २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हे ब्राह्मण धर्माचे समर्थक म्हणून उदयाला आलेले दिसतात आणि हळूहळू त्यांना ब्राह्मण लोकांचा धर्मियांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळालेला दिसतो त्यातूनच मग जातनिहाय जनगणना आणि त्यातूनच जातीय ओळखपत्र देणे आणि त्यातूनच पुन्हा वर्ण व्यवस्था निर्माण करणे असा एक नवा अजेंडा पुढे आलेला दिसतो नेहमीप्रमाणे बहुजन समाज झोपलेला आहे त्याला या मागची खोच कळलेली दिसत नाही ब्राह्मणधर्मी लोक कधीही थेट मागणी करत नाहीत ते ब्राह्मणेतर लोकांच्याकडून त्यांच्या अजेंडात बसणारे मागणी येईल अशा तऱ्हेने नियोजन करतात इथेही समाजवादी लोकांना जातीय जनगणणेची मागणी करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलेले आहे आणि मग त्यांच्याद्वारे स्वतःचा ब्राह्मण धर्मीय अजेंडा आणण्याचा प्रयत्न भविष्यात करण्यात येईल त्या अंगाने पावले टाकणे सुरू झालेले आहे
भारतात जेव्हा जेव्हा जय श्रीराम आणि जय श्री कृष्ण जन्माला येते तेव्हा तेव्हा भारतीय लोक पराभूत होतात पराभूत मनोवृत्तीत वावरायला लागतात हा इतिहास आहे लक्ष्मीची पूजा सुरू होते परंतु संपत्ती सोडून जाते हे 1000 पासून सातत्याने घडलेले आहे याचे कारण प्रत्यक्षा पेक्षा काल्पनिक इतिहासावर विश्वास आणि काल्पनिक गोष्टींच्या वरचा विश्वास वाढत जातो महाकाव्य धर्मग्रंथ बनतात आता पुन्हा तेच घडते आहे मी नेहमीच मांडत आलेलो आहे की हिंदू या शब्दाचा माझ्यासाठी असलेला अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला अर्थ आहे त्यात भारतात जन्मलेले सर्वधर्म येतात आणि हिंदू कायदा हा भारतात जन्मलेल्या सर्व धर्मीय लोकांना लागू होतो मुस्लिम स्वतंत्र कायदा संविधानात शाबूत ठेवून आपण हिंदू नाही आहोत असेच डिक्लेअर करतात आणि काँग्रेसने ते हिंदू नाही आहेत असेच घटनेद्वारे डिक्लेअर केलेले आहे मी समान नागरी कायद्याची मागणी करतो कारण जर का मुस्लिम आणि ख्रिश्चन हिंदू व्हायचे असतील तर त्यांच्यासाठी समान कायदा असणे आवश्यक आहे शेवटी एक कसोटी असते आणि ती तुम्ही ठरवायची असते माझ्यासाठी समान नागरी कायदा ही अशी कसोटी आहे जर का खरोखरच मुस्लिम आणि ख्रिश्चन या देशाशी निगडित असतील आणि त्यांचा धर्म हा भारतीय ख्रिश्चन धर्म किंवा भारतीय मुस्लिम धर्म असणार असेल तर त्यांनी समान नागरी कायदा स्वीकारलाच पाहिजे अशी माझी स्पष्ट आणि स्वच्छ मागणी आहे उगाच गोंधळ उडवून घेणे आणि गोंधळ उडवणे मला जमत नाही
नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भामध्ये काहीही केलेले नाही समान नागरी कायदा आणतो म्हटलेले आहे पण प्रत्यक्षात त्या अंगाने जे काय चालले आहे ते इतके स्लो चालले आहे की तोपर्यंत हिंदुत्ववाद पराभूत झालेला असेल भारतामध्ये ब्राह्मण धर्मी लोक नेहमीच बहुजन समाजामध्ये आवश्यक नसलेला हस्तक्षेप करत असतात आणि बहुजन समाजाची वाट लावत असतात आणि याचे एकमेव कारण या लोकांची सत्ता पिपासा होय संपूर्ण भारतीय समाजावर कायमच नियंत्रण ठेवायचे मात्र त्या नियंत्रणाची जबाबदारी घ्यायची नाही त्यासाठी ब्राह्मण धर्माचा स्वीकार करणारे सत्ताधारी किंवा क्षत्रीय नेमायचे असा हा उद्योग असतो सत्ता पिपासा असलेले सत्ताधारी किंवा क्षत्रिय त्यांना सामील होतात तर ब्राह्मण धर्म न मानणारे सत्ताधारी किंवा क्षत्रिय त्यांच्या विरोधात बंड करतात हा इतिहास आहे एकदा का असे सत्ताधारी त्यांना प्राप्त झाले की मग त्यातून एक दुष्टचक्र आणि शोषणचक्र निर्माण होते ज्यात बहुजन समाज भरडला जातो आत्तापर्यंत तरी याबाबतीत कायमच फक्त शैव जागे आहेत हा इतिहास आहे म्हणजे रामानुजाचार्य वगैरे लोकांनी वैष्णव धर्म आणल्यानंतर त्या विरोधात बंड फक्त बसवेश्वर करतात हा इतिहास आहे आता सुद्धा फक्त शैव लोक असे आहेत की जे यासंदर्भात काय चालले आहे ते ओळखून आहेत आणि नेहमीप्रमाणे ते संघटित प्रतिकार करतीलच काँग्रेसमध्ये ही ताकद आपल्याकडे वळवण्याची खूप खूप संधी असायला हवी होती परंतु असे काही घडलेले दिसत नाही याचे कारण राहुल गांधी हे अतिशय आंधळे नेतृत्व आहे जेव्हा धार्मिक भूमिका टक्करतात तेव्हा धार्मिक भूमिका घ्याव्या लागतात सेक्युलर वादाचा फालतू गवगवा करून चालत नाही मुळात जनतेशी नाते जोडावे लागते रस्त्यावर भेटणारे पाच करोड सेक्युलर लोक म्हणजे भारत नव्हे राहुल गांधी मूळचे शैव आहेत कश्मीरी पंडित आहेत याचा त्यांनाच विसर पडलेला दिसतो खरे तर त्यांना गोल्डन चान्स होता पण त्यांनी तो गमावलेला दिसतो त्यामुळे एका शैव पार्टीची गरज आहे ही पार्टी भाजपाच्या अंतर्गत निर्माण होईल किंवा भाजप बाहेर निर्माण होईल सध्या तरी शक्यता अशी दिसते की भाजपा मध्येच फूट पडेल कारण ओबीसी अस्वस्थ झालेले आहेत जर का सर्व हिंदुत्व हे ब्राह्मणी हिंदुत्व होणार असेल तर ब्राह्मणी हिंदुत्वाला डावलणारे आणि त्या विरोधात उभी टाकणारे सर्व नेतृत्व संघटित करावे लागेल किंवा शैव हिंदुत्वाची पार्टी निर्माण करावी लागेल याची जाणीव आता काही लोकांच्यात निर्माण झालेली दिसते विशेषता बहुजन समाजातले पुढारी यासंदर्भामध्ये वेगळा विचार करतायत मात्र त्यांना अजूनही शैव धर्माकडे परतावेसे वाटत नाही ही खरे तर शैवधर्मी लोकांची शोकांतिका आहे आज ना उद्या या लोकांना अक्कल येईलच खरे तर नरेंद्र मोदी यांना इतिहासात संपूर्णपणे नवे वळण घेण्याचा आणि इतिहासाला नवे वळण लावण्याचा एक गोल्डन चान्स होता परंतु हा चान्स त्यांनी गमावलेला आहे
त्यांची ब्राह्मणी हिंदुत्वाकडे झालेली वाटचाल ही त्यांच्या नेतृत्वाची प्रचंड मोठी शोकांतिका आहे याचा परिणाम काय होणार हे सांगण्याची गरज नाही भारताची अर्थव्यवस्था सुद्धा हळूहळू कोसळत जाईल कारण जेव्हा भारत वैष्णव बनतो तेव्हा तेव्हा भारताची अर्थव्यवस्था कोसळते आणि अनेकदा ती विदेशी लोकांच्या ताब्यात जाते. एक हजार नंतर भारताची अर्थव्यवस्था ही मुस्लिमांच्या ताब्यात गेली आणि नंतर ती इंग्रजांच्या ताब्यात गेली हा इतिहास आहे आता सुद्धा अनेकांना परदेशातून भारत नियंत्रणात आणता येईल अशी शक्यता वाटते हे लोक प्रयत्न केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत आणि ब्राह्मणधर्मी लोक त्यांना एक ना एक दिवस साथ देतीलच कारण आतापर्यंतचा इतिहास तरी असाच आहे इस्लामिक राजवटींना आणि नंतर आलेल्या इंग्रज राजवटीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण लोकांनी पाठिंबा दिलेला होता आणि सरकार दरबारी ब्राह्मण लोकच मोठ्या प्रमाणात होते ही वस्तुस्थिती आहे भविष्यात सुद्धा फार काही वेगळे घडेल असे वाटत नाही वेगवेगळ्या कंपन्यांच्या मध्ये ब्राह्मण सीईओ येतील आणि ते या नवीन मल्टिनॅशनल कंपन्यांच्या साठी काम करतील हे उघड आहे
इतिहास रिपीट होणार आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की ते थांबवण्याची शक्यता वा ताकद कोणातच आता दिसत नाही मी शैव लोकांनां आवाहन करतो की आता त्यांनीच भाजपमध्ये बदल घडवून आणावा शेवटी हा देश आपला आहे आणि तो आपणच सांभाळला पाहिजे जर तुम्ही काँग्रेसमध्ये असाल तर राहुल गांधी यांना जाऊन भेटा आणि त्यांना काय चालले आहे याची कल्पना द्या मला त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत मात्र भाजपमध्ये बदल घडवता येणे शक्य आहे कम्युनिस्ट व समाजवादी लोक तर कधीच शैव धर्माच्या पक्षामध्ये नव्हते ते कायमच शिवाजी महाराज की जय म्हणतात मात्र शिवाजी महाराजांच्या शैव धर्मापासून पळून जातात हीच गोष्ट आंबेडकरवादी लोकांची आहे त्यांना अजूनही शैव धर्म म्हणजे हिंदू धर्माचे विकसित रूप आहे असे वाटते त्यांनाही शिवाजी महाराज हवे असतात परंतु शिवाजी महाराजांचा शैव धर्म नको असतो पुरोगामी लोकांनी शैव धर्माला दिलेला नकार हाच खरा तर फार मोठा दोष पुरोगामी चळवळीत राहिला त्यामुळे पुरोगामी चळवळीशी निगडित असणारे पक्ष शैव धर्मासाठी निकम्मे झाले
त्यामुळे आपणाला आशा उरते ती काँग्रेस आणि भाजप होय ब्राह्मण्यवादी हिंदुत्वाकडे भाजप पूर्णपणे जाण्याआधीच आपण ही प्रोसेस थांबवण्यात यशस्वी झालो तर सध्या तरी तितके यश सुद्धा महत्त्वाचे ठरेल असे वाटते
श्रीधर तिळवे नाईक
Comments
Post a Comment